पिंपरी चिंचवड ः पोलीस कर्मचार्याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10 वाजता उघडकीस आली. धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. धीरज याचे वडील दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते माजी सैनिक देखील आहेत. धीरज याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.