दिघीत सांगलीकर युवा मंचाची स्थापना

0

दिघी : मिडगुलवाडी येथील सांगलीकर कुटुंबाच्यावतीने सांगलीकर युवा मंचाची स्थापना करण्यात आली असून याचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवीका निर्मला गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दत्ता गायकवाड, संजय गायकवाड, माजी सैनिक विकास आघाडीचे शहर अध्यक्ष प्रल्हाद जगताप व मोठ्या संख्येने सांगली कर उपस्थित होते.

रोजगार उपलब्ध झाले
यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, राज्यातील अनेक कानाकोपर्‍यात रोजगारासाठी विविध लोक येथे आले आहेत. त्यामुळे या परिसराला वेगळे महत्व येऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या परिसराची अनेक क्षेत्रात भरभराट झाली असून अनेक संधीही निर्माण झाल्या आहेत. यासाठी आपल्या सर्वांचं योगदान नाकारुन चालणार नाही.

सहकार्यासाठी मंचाची स्थापना
निर्मला गायकवाड म्हणाल्या की, सांगलीकरांनी आपल्या कष्टाच्या जोरावर इतरापुढे आर्दश ठेवला असून त्यांच्याकडून इतरांना देखील शिकण्यासारखे खुप आहे. सांगलीकर युवामंचाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना संस्थेचे अध्यक्ष वसंत शेजाळ म्हणाले की, शेकडो मैल दूर आलेल्या सांगलीकरांना त्यांच्या विकासात सर्वतोपरी प्रामाणिकपणे सहकार्य करणे हाच उद्देश ठेवुन सांगलीकर युवा मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी आमदार लांडगे व उपस्थित नगरसेवक यांची वेळोवेळी मदत घेणार आहे. यावेळी महिला वर्गासाठी हळदी कुंकाचा देखील कार्यक्रम घेण्यात आला.