नगरसेवक डोळस यांनी अधिकार्यांना सुनावले
दिघी : गेल्या दिड महिन्यांपासून दिघी, बोपखेल परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवक विकास डोळस यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच अधिकार्यांना सोबत घेऊन विस्कळीत पाणी पुरवठा होत असलेल्या भागात समक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे उपस्थित होते. महापालिकेच्या पाणी-पुरवठा करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना याबाबत लक्ष देण्याबाबत सांगितले होते. मात्र याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नगरसेवक डोळस यांनी कर्मचार्यांना सुनावले.
हे देखील वाचा
अधिकार्यांसह केली पाहणी
नगरसेवक डोळस म्हणाले की, गेल्या दिड महिन्यांपासून दिघी, बोपखेल भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या इतर भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना दिघी परिसरात वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे सोमवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार यांना सोबत घेऊन विस्कळीत पाणी पुरवठा होणार्या भागाची पाहणी केली. या भागाचा पाणी प्रश्न पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी त्वरित मार्गी लावावा.