दिघी परिसरात महावितरणच्या कामाची ‘बोंब’

0
नगरसेविका बारसे यांच्यामुळे पूर्ण झाले काम
दिघी : हरी ओम चौक, भोसरी, प्रभाग गवळीनगर क्र5 मध्ये वारंवार वीज जाण्याचे प्रमाण जास्त आहे. सतत वीज जात असल्याने नागरिकांना याची सवय झालेली आहे. हा नागरिकांचा रोजच्या आयुष्यातला एक भागच झालाय. पण एखादा कार्यक्रम वीज नसल्यावर रखडला तर आणि तोही शालेय विद्यार्थ्यांचा, तर मोठी पंचाईत. तसाच अनुभव आदर्श शिक्षण संस्था दिघी रोड येथे अनुभवायला मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि नगरसेविका प्रियंका बारसे या दोन्ही बाजुने मुलांची, पालकांची होत असलेली घालमेल आणि नागरिकांचे वीज कधी येणार हे फोन असे सहन करणे सुरू होते. तरीही लवकर वीज येई ना. शेवटी नगरसेविका बारसे यांनी महावितरण कर्मचार्‍यांना बोलावून घेतले. वीज सुरळित होण्यासाठी बराच कालावधी गेला. मात्र काम पूर्ण करून कार्यक्रम पार पडला.
याबाबत नगरसेविका बारसे म्हणाल्या की, शाळेत मुलांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांचा, शिक्षकांचा याबाबत गेले काही दिवस सराव सुरू आहे. त्यात ऐन कार्यक्रमाला वीज नव्हती. त्यामुळे परीसरातील नागरिकांचे आणि पालकांचे विचारणा करणारे कॉल येत होते. त्यामुळे डीपी बॉक्सला काही त्रास तर नाही ना, हे पहाण्यासाठी गेले असता तिथे कुलुप नाही. त्या डीपी बॉक्सच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या. नागरिकांचे म्हणणेनुसार पहाटे चार वाजल्यापासुन वीज नव्हती. सातनंतर हे कळाल्यावर अधिकारी रोटे यांना फोन लावला कर्मचारी आले. जुन्या पट्ट्यांची शोधाशोध आणि त्यानंतर जवळ जवळ 9 वा.वीज पुर्ववत झाली. मी स्वतः उभ राहुन करून घेतल्यामुळे बर्‍यापैकी लवकर झाले. ज्या डीपीवर 4 ते 5 हजार घरांची वीज आहे, तेथे सुरक्षेची अगदी वानवा आहे.