लोणावळा : लायन्स पॉईंट मार्गावरील एस पॉईंट भरधाव वेगातील कार दिडशे फुट खोल दरीत पडली. कारमधील एक जणाचा जागीच मृत्यु झाला तर एका युवतीसह तीन जण जखमी झाले आहेत. मनिष रमेश प्रितवाणी (वय २५, रा. खारघर, मुंबई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रात्री उशिरा हे पर्यटक कारने लायन्स पॉईट परिसरात गेले होते. नंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दरीत कोसळली.
हे सर्व जण दारुच्या नशेत असल्याची माहिती पुढे आली आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा तपास सुरु आहे.