दिड लाखांची रोकड घेवून जळगावातून वेटर झाला पसार

जळगाव : बँकेत भरणा करण्यासाठी दिड लाखांची रोकड घेवून निघालेला वेटर रक्कम घेवून पसार झाल्याने खळबळ उडाली. रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या लायबा हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून पसार झालेला वेटर मोहम्मद आशान अंसारी (रा.गाजीपूर, बिहार) विरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बिहारी वेटरने दाखवली कमाल
वकार इकबाल मंन्सूरी (19, रा.फिरदोस पॅलेस, सलार नगर, अजिंठा चौक) यांचे शहरातील रीलायन्स पेट्रोलपंपाजवळ लायबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मोहम्मद आशान अंसारी (रा.गाजीपूर, बिहार) हा गेल्या सहा वर्षांपासून वेटर म्हणून कामास होता. गेल्या सहा वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करीत असल्याचे त्यंच्यावर वकार मंन्सूरी आणि त्यांचे वडील इकबाल मंन्सूरी यांचा विश्वास बसला होता. शुक्रवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता वकार मंन्सूरी यांनी वेटर मोहम्मद अंसारी याला दुसर्‍या पार्टीचे पैसे बँकेत भरण्यासाठी दीड लाख रुपयांची रोकड दिली मात्र मोहम्मद अंसारी हा दीड लाख रुपये घेवून बँकेत न भरता पसार झाला. शिवाय हॉटेलमधील अन्य कामगारांकडून त्याने उधारी म्हणून 90 हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वकार इकबाल मंन्सूरी यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी मोहम्मद आशान अंसारी (रा.गाजीपूर, बिहार) यांच्याविरोधात शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.