यावल वनविभागाच्या गस्ती पथकाची कारवाई
यावल :- निमड्या गावाकडून जाणार्या एका वाहनात बेकायदेशीररीत्या डिंकाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने गुरुवारी वाहनाचा पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली तर दिड लाख रुपये किंमतीचा व 505 किलो वजनाचा धावडा डिंक जप्त करण्यात आला. अवैधरीत्या डिंकाची वाहतूक करणार्या फिरोज अकबर तडवी व आरीफ सलीम तडवी (दोन्ही रा. निमड्या, ता.रावेर) यांना अटक करण्यात आली. वाहन चालकासह मालकाकडे डिंक वाहतुकीचा कुठलाही परवाना न आढळल्याने वाहन (क्र.एम.पी.20 एच.ए.0443) जप्त करण्यात आले.