दिड लाखांसाठी विवाहितेला छळले : मुंब्रातील पतीसह सहा संशयीतांविरोधात गुन्हा

Harassment of a married woman in Bhusawal for not bringing half a lakh : Crime against six suspects including Husband भुसावळ : शहरातील माहेर व मुंब्रा येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह सहा संशयीतांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिड लाख रुपये न आणल्याने छळ
बुशराबी शेख रफिक (गौसीया नगर, भुसावळ, ह.मु.हनुमान टेकडी, मुंब्रा, ठाणे) यांचा लग्नानंतर जानेवारी 2021 पर्यंत पतीसह सासरच्यांनी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने शारीरीक मानसिक छळ करीत दमदाटी केली. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी शनिवारी दुपारी तक्रार दिल्यानंतर पती रफिक शेख सुभान, सासू रईदा शेख सुभान (ह.मु.हनुमान टेकडी, मुंब्रा, ठाणे), नणंद काली शेख इम्रान, नंदोई इम्रान शेख तैय्यूब (बाबा नगर, स्मशानभूमीजवळ, यावल), साजी शेख इम्रान, नंदोई शेख इम्रान (गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय शरीफोद्दीन काझी करीत आहेत.