दिनेश चंडीमल 2 कसोटी सामन्यांना मुकणार

0

कोलंबो । भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेआधीच यजमान संघाला पहिला झटका बसला आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेचा नवनियुक्त कर्णधार दिनेश चंडीमल पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. श्रींलकेतील संडे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंडीमलला न्यूमोनियाने त्रस्त असून उपचारांसाठी तो गॉलमधील एका रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरु होणार्‍या कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नाही असा अंदाज आहे. मात्र, यासंदर्भात श्रीलंकेच्या संघव्यवस्थापनाने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

चंडीमलशिवाय तुम्ही पहिल्या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करा. चंडीमल एका आठवड्यात बरा झाला नाही तर तो खेळू शकणार नाही. चंडीमलच्या गैरहजेरीत डावखुरा फिरकी गोलंदाज रंगाना हेरथकडे नेतृत्व सोपवले जाईल. 39 वर्षीय हेरथला कर्णधारपदाचा अनुभव असून याआधी त्याने कसोटी सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व केले आहे. मात्र यासंदर्भात क्रिकेट श्रीलंकेने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. चंडीमल रुग्णालयात उपचार घेत आहे हे खरे आहे. त्याच्या रक्त तपासणीचा अहवाल उशीरा मिळाला, पण त्याला निमोनिया झाला आहे. गुुरसिन्हा यांच्या माहितीनंतर चंडीमल पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
– असांका गुरुसिन्हा, संघाचे व्यवस्थापक