दिपनगरजवळ बल्कर हटविणाऱ्या फाैजदारास मारहाण

0

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील दिपनगर समाेर राख भरण्यासाठी उभ्या राहणाऱ्या बल्कर महामार्गावर उभे राहू नये यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांच्या अादेशावरून तालुका पाेलिस ठाण्यासह वाहतूक शाखेचे पाेलिस अधिकारव कर्मचारी बल्कर हटविण्याची कारवाई करीत असतांना पाेलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना मारहाण करणाऱ्या दाेन जणांविरूध्द तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला असून दाेन्ही जणांना अटक केली अाहे. यामुळे बल्कर चालकांमध्ये खळबळ उडाली अाहे. पाेलिसांनी सहा बल्कर ताब्यात घेत तालुका पाेलिस ठाण्यात जमा केल्या अाहे. दिपनगर जवळ राख भरण्यासाठी राज्यभरातून बल्कर येत असतात. ही अालेली बल्कर राष्ट्रीय महामार्गावर उभे केले जात असतात. यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत असताे.यापूर्वीही वारंवार तालुका पाेलिसांकडून सूचना करूनही बल्कर रस्त्यावरच उभे केले जात असते. त्यामुळे वाहतूकीला त्याची अडचण हाेत असते. दरराेजच बल्कर रस्त्यावर उभे राहतात.पाेलिसांकडून सूचना दिल्यावरही चालक एेकन नसल्याने ते रस्त्यावर गाडी थांबवीत असतात. त्यामुळे रविवारी सकाळी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांच्या सूचनेवरून डीवायएसपी गजानन राठाेड यांनी तालुका पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पाेलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच शहर वाहतूक शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक दिपक गंधाले व त्यांच्या सहकाऱ्यांना रस्त्यावरील बल्करवर कारवाई करीत रस्ते माेकळे करण्याच्या सूचना केल्यात. रस्त्यावर एकही बल्कर दिसायला नकाे अश्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या हाेत्या. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजता तिन्ही पाेलिस अधिकारी व पाेलिस कर्मचारी यांनी दिपनगर गाठले. 

अशी झाली कारवाई
दिपनगर येथील ५०० मेगा वॅट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमाेर लावण्यात अालेले रस्त्यावरील बल्कर दूर करण्यास पाेलिसांनी सुरूवात केली. प्रत्येक गाडीच्या चालकाला गाडी तेथून हटवून अन्य ठीकाणी उभ्या करऱ्याच्या सूचना देण्यात अाल्यात, यावेळी काही चालकांनी पाेलिसांशी तू तू मै मै झाली हाेती. यावेळी पाेलिस कारवाई करीत असतांनाच अमन जगबीदर सुनसाेये(वय २६ रा.निंभाेरा, ता. भुसावळ) अाणि कुलदिप एकनाथ महाले (वय ३४, रा. रा. समता नगर, रेल्वे हाॅस्पीटलमागे, भुसावळ) यांनी फाैजदार करेवाड यांच्यावर हल्ला केला. यात फाैजदार करेवाड यांच्या डाव्या गालास व डाव्या हाताच्या करंगळीस मार लागला. यावेळी पाेलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पाेलिस निरीक्षक दिपक गंधाले यांनी अन्य गाड्यांची तपासणी करीत असतांना करेवाड यांच्याकडे धाव घेतली. अन्य पाेलिसांनी सुध्दा करेवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दाेन्ही संशयीतांच्या जागेवरच मुसक्या अावळल्यात. 

ही बल्कर केली जमा
पाेलिसांच्या पथकाने दिपनगरसमाेर उभ्या राहात असलेल्या बल्करमधील एमपी ०९ एचएच ४३४२, एमपी ०९ एचएच ३९८५, एमएच १५ एफ व्ही ७८०७, एमएच ४४- १५४४, एमएच ४६ बीएफ ३४५५, एमएच ४४ – १६४४ ही वाहने ताब्यात घेतली तर एमएच १९ सीवाय ३४३२ या वाहनाला गुन्ह्यात घेतले अाहे. अन्य वाहनांवर कारवाई करून त्यांना साेडण्यात येणार अाहे,मात्र या वाहनाला गुन्ह्यात नाेंद केले असल्याने त्याची कायदेशीर साेपस्कार पूर्ण झाल्यावर सुटका हाेणार नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.