दिपनगर येथे कामगार दिनानिमित्त स्वच्छता महाअभियान

0

भुसावळ। दीपनगर विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त संपूर्ण वसाहतीमध्ये स्वच्छतेचे महाअभियान राबविण्याचा संकल्प व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आलेला आहे. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता शक्तीगड कार्यालय येथे मुख्यअभियंता माधव कोठुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

यानंतर 8.30 वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचारी वसाहतीमधील पोलिस चौकी जवळ जमून मुख्य अभियंता माधव कोठुळे यांच्या हस्ते कचरा संकलनास सुरुवात होऊन स्वच्छता अभियानास सुरुवात होईल. मग जुने मार्केट, श्रीराम मंदिर, गणेश मंदिर, नवीन क्रीडा भवन, बालोद्यान, योग भवन, नवीन मार्केट, रंगोली गार्डन, बीएसएनएल कार्यालय, सोसायटी मार्केट, पोस्ट आफिस, दवाखाना, सुपर डी, डीएम सेक्टर मार्गे फेकरी गेट या ठिकाणी येऊन अभियानाची सांगता होईल.