मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नानंतर मुंबईत बॉलिवूडकरांसाठी ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. यावेळी लाईमलाईटपासून दूर असणारा रॅपर हनी सिंगची उपस्थिती सर्वांचे लक्षवेधक ठरली.
मागील काही दिवसांपासून हनी सिंगची तब्येत खराब होती. त्यामुळे तो गायब होता. मात्र, रणवीर सिंग आणि त्याची चांगली मैत्री असल्यामुळे तो दिपवीरच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाला. मागील काही दिवसांमध्ये तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे म्हंटले जात होते. मात्र, या आजारातून तो आता बाहेर पडला आहे.
रिसेप्शनमध्ये रणवीरने आणि हानीने भरपूर धुमाकूळ केली. आता हनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय हे पाहावे लागेल.