दिमित्रोव्ह, मुगुरूजाने जिंकली सिनसिनाटी ओपन

0

सिनसिनाटी । अव्वल मानाकंन मिळालेल्या स्पेनच्या राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत हरवणार्‍या ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू निक किर्गियॉसला सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूषांच्या अंतिम फेरीत ग्रिगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाचा सामना करता आला नाही. सातवे मानांकन मिळालेल्या बुल्गारियाच्या दिमित्रोव्हने किर्गियॉसला 6-3, 7-5 अशी मात देत महिलांच्या गटात स्पेनची आघाडीची महिला टेनिसपटू गार्बिने मुगुरूजाने रोमानिया हालेपला हरवून विजेतेपद मिळवले. दिमित्रोव्हला मानाकंनाच्या क्रमवारीत दोन क्रमाकांचा फायदा झाला आहे.

विजयानंतर 26 वर्षीय दिमित्रोव्ह म्हणाला की, मास्टर्स 1000 मालिकेतील पहिलेच विजेतेपदं असल्यामुळे खूश आहे. यापेक्शा जास्त काही मागू शकत नाही. या स्पर्धेचे आकर्षण होते. त्यामुळे स्पर्धा जिंकण्याचा नेहमीच विचार करायचो. दिमित्रोव्हने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. मास्टर्स 1000 स्पर्धेत मध्ये अशी कामगिरी करणारा तो नोवाक जोकोविचनंतरचा पहिला खेळाडू आहे.