दिलजीत नंतर आता जस्सी गिलचीही बॉलीवूड मध्ये एन्ट्री

0

मुंबई: पंजाबचा स्टार सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याचा ‘सुरमां’ चित्रपटातील दमदार अभिनय सर्वांनी पाहिला. आता बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण झाली आहे. दिलजीतनंतर आता पंजाबी अभिनेता व गायक असलेला जस्सी गिल यालाही बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करायची आहे.

जस्सी गिल बॉलिवूडमध्ये ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. एका मुलाखतीत जस्सी म्हणतो की, ‘दिलजीतसह माझी कुठलीही स्पर्धी नाहीये, आम्ही आमचे काम करत आहोत. आम्हाला गर्व आहे की, आम्ही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करत आहोत. ‘फिल्लोरी’, ‘उडता पंजाब’, ‘सूरमां’ या चित्रपटातून पंजाबचे योग्य प्रतिनिधित्व होत आहे. मी देखील बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही तो म्हणाला.