नवी दिल्ली: गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. मात्र आजपासून सामान्यांना दिलासा मिळणार आहे. गॅस सिलिंडरच्या दरात कपात करणायत आली आहे. विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2019 नंतर दरात कपात झाली आहे.
ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत तब्बल सहा वेळा गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 805.50 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 839.50 रुपये, मुंबईत 776.50 आणि चेन्नईमध्ये 826 रुपये आहे. 1 मार्चपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. 12 फेब्रुवारीला किमतीत वाढ झाली होती. इंडेन गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली होती.
विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली होती. तसेच 1 जानेवारी रोजी बजेट मांडण्यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या होत्या. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली होती. दरमहिना सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार गॅसच्या किमतीत बदल होत असतो. गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.