नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचे दोन रुग्ण देखील बरे झाल्याने नंदुरबार जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही. ही एक आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील 21 रुग्णांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे, उर्वरित
19 रुग्ण पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहेत.
17 रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज मिळाला असून उपचार घेत असलेले दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. आज सायंकाळी त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे