नंदुरबारात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या 20 जणांना 5 हजाराचा दंड

0

नंदुरबार। लॉकडाऊन आणि संचारबंदी काळात नंदुरबार शहरात मॉर्नींग वॉक करणाऱ्या २० लोकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास 5 दिवसाची शिक्षा दिली जाणार आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी भारत लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्याच प्रमाणे संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे, असे असतांना सकाळी मॉर्निंग वॊक करणाऱ्या 20 जणांना पकडून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.