अमळनेर: येथील कोव्हीड केअर सेंटरमधून आतापर्यंत ३५ जण कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरपोच रवाना झाले आहेत. एका मिनी लक्झरीतून त्यांना आमदार अनिल पाटील यांनी क्वॉरोंटाईन नोटीस देत रवाना केले. आता त्यांना होम क्वॉरोंटाईन करण्यात आले.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, अमळगावचे माजी सरपंच मिलिंद पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, डॉ आशिष पाटील, गिरीष शिंदे, डॉ टी आर फडके, डॉ आरती नेरपवार, डॉ भाविका पाटील, डॉ अक्षय न्हाळदे, डॉ तुषार बडगुजर, डॉ विकास मोरे, परिचारिका एल व्ही चौधरी यांच्यासह इतर परिचारिका, आरोग्य कर्मचारी सफाई कामगार यांच्यासह पोलीस कर्मचारी व विविध कर्मचारी एसटी बस चालक सचिन पाटील, सुनील देवरे यांनी अहोरात्र काम करून रुग्णांना समुपदेशन केले. धीर देत त्यांना जगण्याची खात्री दिली. आतापर्यंत या कोव्हीड केअर सेंटर मधून ३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. सोमवार दि.१८ मे रोजी आणखी रुग्ण सोडण्यात येणार आहेत. यांचा सर्वांचा उपचार संपणार असून काही रुग्ण आज घरी परतणार आहेत. अजून दोन टप्प्यात रुग्ण परतणार आहेत. आता 33 रुग्ण रुग्णालयात आहेत.
एका तरुणीची प्रतिक्रिया
या साखळीत आपण आलो कोरोनाशी लढा देत आपण मात केली आज आनंद वाटतोय अनपेक्षितपणे आलेल्या आजाराचे संक्रमण किती भयानक असते हे आम्ही अनुभवले.
१०७ रुग्ण आढळले
एक महिन्याच्या प्रवासात शहरात एक ते तब्बल 107 रुग्ण आढळून आले याचा भयानक प्रसार करण्यास येथील नागरिकच जबाबदार आहेत. कदाचित सोशल डिस्टनसिंग पाळले असते आणि घरात देखील सॅनिटायझर वापरले असते तर कोरोना कदाचित कुठेतरी संख्या प्रसार कमी झाला.
१७ एप्रिलला मुंगसे येथील वृद्ध महिला पॉझिटीव्ह निघाली. अमळनेर ग्रीन झोन झाला असता पुन्हा संकटाची सावली दिसू लागली मात्र मुंगसे परिसरात जवळपासचे सर्व संपर्क असलेली गावात कठोर लॉकडाऊन वापरण्यात आला जनतेने पण उत्तम प्रतिसाद देत यशस्वी झाले आणि एकमेव पॉझिटीव्ह महिला स्वतःच्या हिंमतीने आणि सकारात्मक ईच्छा शक्ती ठेवत कोरोना वर मात करीत परतली. आणि मुंगसे गाव कोरोनावर मात करीत कोरोनामुक्त झाले. मात्र अमळनेर शहर कोरोना संख्येने वाढले. झपाट्याने वाढत गेलेली संख्या 107 वर थांबली. ही वाढती संख्या पाहता कठोरपणे पाच दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यामुळे साखळी तुटणे शक्य झाले.