नंदुरबार। जिल्ह्यातील 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपाचारानंतर अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यात रजाळे येथील 7 व जिल्हा रुग्णालयाच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 34 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. त्यापैकी 28 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यच्या दृष्टीने ही एक समाधानाची बाब आहे