दिलासादायक: भारतातील रिकव्हरी रेट 65 टक्क्यांपेक्षा अधिक

0

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाने कहर माजविला आहे. दररोज ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट ६५ टक्क्यापेक्षा अधिक आहे. देशातील रिकव्हरी रेट ६५.७७ टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट अधिक असल्याने दिलासादायक स्थिती आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. मागील २४ तासांत देशात ५२ हजार ९७२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. मागील २४ तासात ७७१ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात आत्तपर्यंत ३८ हजार १३५ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

सद्यस्थितीत देशात रुग्णवाढीचा दर ३२.१२ टक्के आहे. तर मृत्युदर २.११ टक्के आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने देशात दिलासादायक स्थिती आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ७१९ रुग्ण आढळून आले आहे. त्यातील १ लाख ४९ हजार ५२० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला असल्याने दिलासादायक स्थिती आहे.