नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज ८५ हजारपेक्षा अधिकने भर पडत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी २५ सप्टेंबरला एकाच दिवशी देशात ८५ हजार ३६२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. २४ तासात १०८९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल आहे. मात्र दुसरीकडे समाधानकारक बाब म्हणजे भारतातील रिकव्हरी रेट देखील अधिक आहे. देशात आतापर्यंत ४८ लाख ४९ हजार ५८५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या घडीला ९ लाख ६० हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा जगापेक्षा अधिक आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८२.१४ टक्के आहे. तर सध्या अॅक्टीव्ह रेट १६.२८ टक्के आहे.
India's #COVID19 case tally crosses 59-lakh mark with a spike of 85,362 new cases & 1,089 deaths in last 24 hours.
The total case tally stands at 59,03,933 including 9,60,969 active cases, 48,49,585 cured/discharged/migrated & 93,379 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/fTL9qjTu8p
— ANI (@ANI) September 26, 2020
भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. मात्र महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देखील ७६ टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या २ लाख ७२ हजार ७७५ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासात महाराष्ट्र १७ हजार ७९४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर १९ हजार ५९२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आज 17794 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 992806 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 272775 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता76.33% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 25, 2020