दिलासादायक; १५ तासापासून राज्यात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

0

मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोना विष्णूचे ३९ रुग्ण आढळून आले आहे. राज्यात गेल्या १५ तासापासून नवीन रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यात कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी राज्यसरकारने काय उपाय योजना केली आहे त्याची माहिती दिली.

आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यता आली आहे. या बैठकीत कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. राज्य सरकारने ज्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली आहेत. त्यांची कठोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशासनाला केलेल्या उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीबाबत आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योगजगतातून कोरोना नियंत्रणासाठी काही मदत मिळू शकते का यावर काम सुरु आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांसोबत आज बैठक होत आहे. उद्योजकांना राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात कॉर्पोरेट ऑफिसमधील कामं कशी कमीतकमी ठेवता येतील यासाठी प्रयत्न करण्याबाबत विचारणा केली जाईल. अगदी काम बंद करण्याच्या पर्यायावर देखील विचार केला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.