नवी दिल्ली : भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान तुरुंगात बंद आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची भेट घेण्यासाठी दुसऱ्यांदा भारतीय उच्चायोगाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. भारतीय उच्चायोगाचे अधिकारी वकिलांसोबत परराष्ट्र मंत्रालयात दाखल झाले आहेत.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी उशिरा कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती. आता भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांना पुर्नविचार याचिकेवर हस्ताक्षर करण्यासाठी मदत करणार आहेत.
पाकिस्तानने भारतीय उच्चायोगाला दुसऱ्यांदा भेटण्याची परवानगी दिली आहे. भेटीदरम्यान भारतीय अधिकारी आणि जाधव यांना इंग्रजी भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. तअवच यावेळी पाकिस्तानी अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत, ही अट घालण्यात आली आहे.