दिलीप कुमार स्थिर मात्र आयसीयुतच

0

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, त्यांना अद्याप आयसीयूतच ठेवण्यात आले आहे, असे लीलावती रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे. त्यांना अजून एक-दोन दिवस किंवा त्याहून अधिक दिवस आयसीयूत ठेवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मूत्रपिंडासंबंधी आजार जडल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.