आखतवाडे । येथील रहीवासी मच्छिंद्र नथ्थु गढरी यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक दिलीप गढरी यांना धनगररत्न पुरस्कार ठाणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला. व तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या गडकरी रंगायत येथे ‘धनगररत्न‘ पुरस्कार सोहळा नुकताच आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्यानां ‘धनगररत्न‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये नाशिक मालेगाव महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, मध्यप्रदेश इलेक्ट्रीक बोर्ड संचालक डॉ.मुरहरी केळे, पोलिस उपनिरिक्षक दिलीप गढरी आणि इतर मान्यवरांना गौरविण्यात आले. सदर या क ार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार पद्मश्री विकासजी महात्मे, राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, पनवेल महानगर पालीका आयुक्त सुधाकर शिंदे, आयुक्त संगिता धायगुडे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक कुरकुंडे, सहसचिव अमोल होळकर, इंद्रजित कर्डीले, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, मुख्य सल्लागार बापुसाहेब हाटकर, उपाध्यक्ष पृथ्वाीराज गढरी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात आनंदोत्सव
दिलीप गढरी यांना धनगररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आखतवाडे गावात आनंद साजरा करण्यात आला असुन दिलीप गढरी यांचे गावातील गोरख नथ्थु गढरी, कैलास गढरी, राजेश रामचंद्र, सुधाकर रामचंद्र, रामकृष्ण गढरी, रमेश गढरी, डॉ.मच्छिंद्रनाथ परदेशी, प्रकाश नामदेव, ज्ञानेश्वर वामन, दर्पण गढरी, परमेश्वर गढरी, दिपक पवार, पांडुनाना, चांगो नामदेव, संजय नारायण, मंगल महादेव, आननसींग गढरी, नवनीत सांडु, आप्पा नारायण व समाज बांधवांनी पुरस्कार मिळाल्याबद्यल अभिनंदन केले.