दिलीप शेलार यांंच्यावर गुन्हा दाखल करा

0

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण, जय आदिवासी युवा शक्तिची मागणी
तळोदा ।
डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या डॉक्टर महिलांवर कठोर कारवाई करुन आक्षेपार्ह फेसबुक कमेंट करणारे दिलीप शेलार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जय आदिवासी युवा शक्ति पदाधिकार्‍यांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, डॉ. पायल या मुंबई येथील नायर रुग्णालयात शिक्षण घेत होत्या. त्या हॉस्पिटलमधील सहकारी डॉक्टर यांच्या रॅगिंगला व जातीवादाला कंटाळून डॉ. पायल यांनी आत्महत्या केली. यासंबंधीची फेसबुक पोस्ट मॅक्स महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवर टाकलेली होती.

त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये इंटरनॅशनल सेंटर पुणे विद्यापीठ बारामती येथे शिकत असलेल्या दिलीप शेलार यांनी आदिवासी मोदी भक्त आणि फक्त सेना-भाजपाला मतदान देतात. त्यामुळे या जंगली वनवासी आदिवासी लोकांसाठी कोणती सद्भावना माझ्या तर मनात नाही. उलट आनंद जास्त आहे. थँक यु ऑल थ्री गर्ल्स, अशी कमेंट केली आहे.

त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या व समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल भारतीय दंडविधान संहितेची योग्य ती कलमे लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जय आदिवासी युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद माळी, जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाडवी, सचिव प्रशांत पाडवी, मीडिया प्रचारक साजन शेवाळे, दिनेश मोरे, वसंत पावरा यांनी केली आहे.