गहुंजे । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या सामना रंगला होता.मात्र हा सामना जरी दिल्ली संघाने 97 धावांनी जिकला असला तरी पुणे संघाच्या नावावर एक विक्रम नोदविला गेला आहे.या आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणताच संघ एकाच पध्दतीने बाद झालेला नाही.मात्र दिल्लीने पुण्याच्या संघातील सर्व खेळाडूंना झेल बाद करून नविन विक्रम नोदविला आहे.संपूर्ण संघ झेल बाद झाल्याने त्याच्यानावावर हा विक्रम नोदविला गेला आहे.सलामीवीर ते शेवटचा फलंदाज सुध्दा झेलबाद झाला आहे.
दिल्लीने तिसर्यांदा दोनशे धावांचा टप्पा ओलांडत
गहुंजे येथील एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत पुण्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पोट बिघडल्यामुळे या सामन्यात खेळू न शकल्याने अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची धुरा सांभाळली.नाणेफेक जिकून पुणे संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिल्ली संघाचा फलंदाज संजू सॅमसन व क्रिस मॉरिस याच्या खेळीमुळे दिल्ली संघाची धावा 200 पलिकडे गेली.यात सॅमसन ने 102 धावा तर क्रिस मॉरिस ने 9 चेंडूत 38 धावा काढल्या.दिल्लीने एप्रिल 2012नंतर प्रथमच 200हून अधिक धावा फलकावर लावल्या. दिल्ली संघाला आयपीएलमध्ये केवळ तिसर्यांदा दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. याचबरोबर 97 धावांनी विजय ही नोंदविला.आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची सर्वात मोठा विजय आहे. पॉवर-प्लेमध्ये अधिकाधिक धावा वसूल करण्याच्या प्रयत्नात पुणे संघाने तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आपल्या लागोपाठच्या दोन षटकांमध्ये अजिंक्य रहाणे आणि मयंक अगरवाल यांना डग-आउटचा रस्ता दाखवला.
धोनी बाद नंतर आशा संपल्या
राहुल त्रिपाठीही केवळ दहा धावा करून परतला, तर फाफ डूप्लेसिसला नदीमने 8 धावांवर बाद केले. आठव्या षटकात बेन स्टोक्स बाद झाला, तेव्हा पुण्याची अवस्था 5 बाद 54 अशी झाली होती. धोनी बाद झाला व पुणे संघाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यानंतर पुण्याचा डाव 16.1 षटकांमध्ये 108 धावांत संपुष्टात आला. पहिला गडी बाद झाला तो कर्णधार अजिक्य रहाणे र 10 (24-1 ),दुसरा गडी मयांक अगरवाल रूपात बाद झाला (34-2),राहुल त्रिपाठी (49-3),फाफ डूप्लेसिस(52-4),बेन स्टोक्स ( 54-5),महेंद्रसिंह धोनी (79-6),भाटीया (94-7),चाहर (100-8), झिम्पा (107-9),दिंडा (108-10)हे सर्व फलंदाज झेल बाद झाले.