पिंपरी-चिंचवड : कोथरूड येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेल्या एका तरुणाने नेहरूनगर येथे आत्महत्या केली. उज्ज्वल उमेद शहा (वय 20 रा. दिल्ली) असे त्याचे नाव आहे. तो एमआयटी महाविद्यालयात प्रवेशासाठी तो पुण्यात गेला होता.
मात्र महाविद्यालयाने त्याला उद्या येण्यास सांगितल्यामुळे तो नेहरूनगर येथील मित्राकडे आला. त्याचा मित्र क्लासवरून परतला असता खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा वाजवूनही उज्ज्वल दरवाजा उघडत नसल्याचे पाहून मित्राने खिडकीतून पाहिले असता उज्ज्वलने पंख्याला गळफस घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.