शहरातील सात जणांचा समावेश : अहवालात कुणालाही कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न
जळगाव – नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिघी जमात परिषदेला जळगाव जिल्ह्यातुनही 13 जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सर्वांची पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्वांची पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्वांची पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
दिल्ली सरकारने दिली जिल्हा पोलीस दलाला माहिती
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिघी जमात परिषदेला जळगाव जिल्ह्यातुनही 13 जण या धार्मिक संमेलनाला उपस्थित होते. कुठलीही तपासणी न करता संबंधित नागरिक परतले अाहेत. दिल्ली सरकारने केलेल्या चौकशीत जळगाव जिल्ह्यातील 13 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. ती नावे जिल्हा पोलीस दलाला कळविण्यात आली आहेत.त्यानुसार या लोकांची चौकशी झाली.
जळगावातील सात जणांचा समावेश
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत या 13 जणांपैकी 2 जण दिल्ली येथेच असून ते तेथे नोकरीला आहेत तर दोन जण नाशिक येथे गेले आहेत. भुसावळ शहरात 2 जण आहे. जळगाव शहरात सात जण असून या सर्वांची पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. नाशिक व भुसावळ येथील लोकांनीही वैद्यकीय तपासणी केली व तसे जिल्हा पोलीस दलाला कळविले आहे. दरम्यान अशाप्रकारे या संमेलनातून जिल्ह्यात परतलेल्या तसेच त्याबाबतची माहिती लपविणाऱ्या नागरिकांच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.