नवी दिल्ली : दिल्लीतील बाजारपेठांच्या ठिकाणी आग लागत असल्याच्या घटना वारंवर घडत आहे. मागील महिन्यात अनाज मंडीत लागलेल्या आगीत ४० जण ठार झाले होते. दरम्यान आज गुरुवारी सकाळी पीरागढी भागातील एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. यात इमारत कोसळली असून त्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याचवेळी इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला आणि इमारत कोसळली. या इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवानही असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य़ सुरू असून 30 ते 35 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.