दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, राजीनामा द्यावा: सोनिया गांधी !

0

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणावरून राजकारण सुरु झाले आहे. दरम्यान यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत दिल्लीती सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.