नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारास काँग्रेस व दिल्लीत सरकारमध्ये असलेले आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह अन्य पक्षांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी भाष्य आहे. सुधारित नागरिकत्व कायद्या बद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे जे नुकसान झाले, त्यासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार आहे, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी असे जावडेकर यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील नागरिकांना हे पाहून आश्चर्य वाटत आहे की, येथील साडेचार वर्षे झोपा काढत असलेलं आम आदमी पक्षाचे सरकार आता निवडणुकीच्या सहा महिने अगोदर प्रयत्न करत आहेत. मात्र दिल्लीतील आगामी निवडणुकीत भाजपा संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.