नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरात ११ जणांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका तांत्रिकासह त्याच्या साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरुन या घटनेसोबतच काही गुढ रहस्य जोडल्याची शंका पोलिसांना आहे. बुराडीच्या संतनगर स्थित भाटिया यांच्या दुमजली घरातील देवघराच्या डायरीत पोलिसांनी ही चिठ्ठी सापडली असून, त्यावरील मजकूर हा हाताने लिहिलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
एक जण सोडून इतर सगळ्यांचे मृतदेह हे घरातील छताला लटकलेल्या स्थितीत होते. त्यातील बहुतेकांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती आणि त्यांचे हात देखील मागे बांधलेले होते. यात सर्वाधिक वयस्कर नरायण देवी (77) यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्या गळ्यावर पोलिसांना खुनाही आढळल्या आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या चिठ्ठीत काही रहस्यमय संकेत मिळत आहेत. त्यात अध्यामिकता, मोक्ष, रीती-रिवाज आणि गेल्या महिन्यातील काही तीथींचा उल्लेख आहे. पूजेत पावरले जाणारे तूप आणि तांदूळ यांसारखी सामुग्री देखील घरातून हस्तगत झाली आहे. त्यामुळे हा घटनेमागे तांत्रिक किंवा एखाद्या साधू यांच्या हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
भाटिया कुटुंबीयांचा मृत्यू हा एखाद्या धार्मिक विधीच्या अनुषंगाने झाला असावा, असा संशय एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. त्या चिठ्ठीत काही सूचनांचा देखील उल्लेख आहे. ज्यात प्रत्येक व्यक्तीला योग्य पद्धतीने डोळ्यांवर पट्टी बांधणे आवश्यक आहे. डोळ्यांत फक्त अंतिम स्थान दिसले पाहिजे, असे नमूद केलेले आहे. मनात श्रद्ध ठेऊन सलग 7 दिवस वडाच्या झाडाची पूजा करावी. यादरम्यान घरी कोणी पाहुणे आल्यास हे कार्य पुढील दिवशी करावे. यासाठी गुरुवारी किंवा रविवारचा दिवस निवडावा, असेही त्या चिठ्ठीत म्हटले आहे.