दिल्लीत आज हाय- प्रोफाईल सभा

0


नवी दिल्ली : आज दील्ली मध्ये देशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस पक्षाची सभा असून राजधानी दिल्लीत आज लोकसभा निवडणुकीचा आखाडा पाहण्यास मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस च्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा या दोन नेत्याच्या रॅली आणि रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्या नेत्याला जास्त प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दोघ नेते एकमेकावर कुठल्या आरोपाच्या फ़ैरी झाडतात याकडे समस्त दिल्लीकराचे लक्ष लागून राहिले आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ नंतर सभा घेणार असून या सभेमध्ये नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, फरीदाबाद,इथून अनेक भाजपचे कार्यकर्ते येणार असल्याची शक्यता भाजप नेते व्यक्त करत आहे. यावेळी रामलीला मैदानावर स्क्रीन लावण्यात आले आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा या पहिल्यांदाच राजधानी दिल्ली मध्ये कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बॉक्सर विजेंद्र सिंग, आणि शिला दीक्षितसाठी प्रचार करणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये १२ में रोजी मतदान होणार असून देशाचे लक्ष राजधानी दिल्लीकडे लागले आहे. कारण राजधानी दिल्ली मध्ये लोकसभेसाठी ७ जागा असून, २०१४ च्या निवडणुकीत या जागांवर भाजपने विजय मिळवला होता. आता पुन्हा भाजप विजयी होतो की, भाजपाच्या जागा कमी होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.