दिल्लीत कॉंग्रेसचा मानहानीकारक पराभव; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीनामा देणार !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. भाजप आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत झाली. आपला ५८ तर भाजपला १२ जागांवर आघाडी मिळालेली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसला एकही जागांवर आघाडी नाही. मताची टक्केवारी पाहता कॉंग्रेसला ३ टक्केही मते मिळालेली नाही. हा मानहानीकारक पराभव जिव्हारी लागल्याने दिल्ली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा राजीनामा देणार आहे. दिल्लीतील पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुभाष चोप्रा यांनी स्वीकारली आहे. ते दिल्ली वरिष्ठांकडे राजीनामा देणार आहे.