नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सरकार बनविणार आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. कॉंग्रेसचा मात्र याठिकाणी मानहानीकारक पराभव झालेला आहे. ७० पैकी ६३ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. काल पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज दिल्ली कॉंग्रेसचे प्रभारी पी.सी.चाक्को यांनी प्रभारीपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली निवडणूक कॉंग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्षा नंतर आता प्रभारी यांनीही राजीनामा दिला आहे.
रविवारी १६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.