दिल्लीत कोरोना संशयिताची आत्महत्या

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात कहर केला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. संशयित रुग्ण कमालीचे धास्तावलेले आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या संशयिताने आत्महत्या केली आहे.रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून संशयित रुग्णाने आत्महत्या केली. रात्री त्या व्यक्तीने जबरदस्तीने विलगीकरण कक्षाचा दरवाजा उघडला आणि सातव्या मजल्यावरून उडी मारली. आत्महत्या केलेली व्यक्ती पंजाबमधील शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन जाण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते.

हा रुग्ण पॉझिटिव्ह होता की, नाही याची याबाबत रिपोर्ट यायचे होते, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली आहे. करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्याला मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक वर्ष ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये तो वास्तव्यास होता. मंगळवारी एआय -301 या विमानाने तो भारतात परतला. विमानतळावर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर करोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.