दिल्लीत दहशतवादी घुसले; रेड अलर्ट जरी !

0

नवी दिल्ली: दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे ३ ते ४ दहशतवादी घुसले आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीत ९ ठिकाणी छापेमारी केली आहे. तर दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी रेड अॅलर्ट जारी करत दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे.

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यापासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहे. बुधवारी रात्रीपासूनच दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शहरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. दिल्लीत घुसलेल्या अतिरेक्यांपैकी दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.