नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय वैद्यकीय संस्थेकडून (आयएमए) सार्वजिक आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील मॅरेथॉन स्पर्धाही रद्द होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा बंद ठेवाव्यात, असेही आयएमएने सांगितले आहे.
प्रदुषणाच्या समस्येमुळे दिल्लीतील 19 नोव्हेंबरची नियोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची विनंतीही आयएमएने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केली आहे. इंडिया गेट आणि राजपथसह दिल्लीतील प्रमुख ठिकाणी करण्यात आलेल्या पाहणीत येथील हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले. या ठिकाणी धुक्याचे आणि पीएम 2.5, पीएम 10 प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे.