दिल्लीत बसविणार ११००० वायफाय: अरविंद केजरीवाल

0

नवी दिल्ली: दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे काम जगभरात प्रसिद्ध आहे. आरोग्य, शिक्षणसह विविध क्षेत्रात केजरीवाल सरकारने मोठे काम केले आहे. दरम्यान आता दिल्लीत ११००० वायफाय बसविण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.४ हजार बस स्थानक, ७ हजार सार्वजनिक बाजाराचे स्थळ याठिकाणी वायफाय बसविण्यात येणार आहे. १०० वायफायचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्याला ५०० वायफाय बसविले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.