दिल्लीत भीषण आग; 43 जण ठार !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु आहे.

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले.

या घटनेवरून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवरून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.