जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिल्ली येथून आलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील व असीम तडवी यांनी त्याचा शोध घेतला. नंतर उपचारासाठी व कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तो दिल्ली येथे धार्मिक स्थळावर गेला होता. 14 रोजी तेथून परत आला होता. तेव्हापासुन तो स्वत: बाबतची माहिती लपवुन वास्तव्यास होता.