दिल्ली अग्नितांडव: पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

0

नवी दिल्ली: दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु आहे. दिल्ली सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमीना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मृतांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान अंतर्गत मदत जाहीर करण्यात आली.

एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. दरम्यान या प्रकरणी इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण देशात या घटनेवरून दु:ख व्यक्त केले जात आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. अजूनही मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.