26 वर्षानंतर वाफेवरील इंजिन आले बाहेर ; आठवडाभरात काम होताच रेवाडीच्या वर्कशॉपमध्ये जाणार इंजिन
गणेश वाघ-भुसावळ । जुनं ते सोनं ही वाड-वडीलांची म्हण… या म्हणीला साजेसे ठरणारे कार्य रेल्वेच्या दिल्ली बोर्डाने हाती घेतले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी दिल्ली ते अलवार दरम्यान वाफेच्या इंजिनांवरील गाड्यांना पर्यटकांची असलेली पसंती पाहता या मार्गावर तब्बल दहा गाड्या सुरू आहेत तर भुसावळात तब्बल 26 वर्षांपासून अडगळीत पडून असलेले इंजिनही तेथे वापरात रेणार असल्याने रेवाडी येथील नऊ तज्ज्ञांची टीम शहरात गेल्या आठ दिवसांपासून दाखल झाली आहेत. आठवडाभरात इंजिनांची दुरुस्ती झाल्यानंतर हे इंजिन राजस्थानातील रेवाडी वर्क शॉपमध्ये परिपूर्ण दुरुस्तीसाठी नेले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुसावळातील लोको शेडमध्ये डागडुजीला वेग ः रेवाडीतील नऊ तज्ज्ञांकडून दुरुस्ती
रेवाडीतील तज्ज्ञांकडून दुरुस्ती
1991 च्या सुमारापर्रंत धावणार्या वाफेसह कोळशावरील इंजिनांच्या दुरुस्तीसाठी भुसावळात अधिकारी व कर्मचारी होते मात्र कालांतराने सर्व निवृत्त झाल्याने रेवाडी (राजस्थान) येथील एसएससी गणपत यांच्या नेतृत्वात एमसीएम सह आठ कर्मचारी या ब्रिटीशकालीन इंजिनाच्या दुरुस्तीसाठी भुसावळच्या लोकोशेडमध्ये दाखल झाले आहेत.
भुसावळात मिळाला ब्रिटीशकालीन ‘खजिना’
भुसावळच्या लोकोशेडमध्ये सुस्थितीतील वाफेवर चालणारे इंजिन असल्याची माहिती दिल्ली रेल्वे बोर्डाला कळाल्यानंतर 3 जुलै 2017 रोजी रेवाडीतील एसएससी गणपत यांना इंजिनाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. 4 जुलै गणपत व यांच्या टीमने इंजिनची खोलवर तपासणी करून कुठले स्पेअर पार्टस् नाहीत याची पाहणी करून तसा अहवाल दिल्ली रेल्वे बोर्डाकडे पाठवला.
भुसावळातील ब्रिटीशकालीन इंजिन पुन्हा धावणार
1991 च्या सुमारास डिझेल इंजिन आल्यानंतर कोळसा व वाफेवर धावणारे इंजिन बंद करण्यात आले मात्र प्रवाशांना जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून एक इंजिन राखून ठेवण्यात आले व 1992 मध्रे हे इंजिन प्रवाशांना पाहण्यासाठी भुसावळच्या रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते. त्या काळचे मध्य रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक बिरेंद्र बिष्णू यांच्या उपस्थितीत हे इंजिन रेल्वे प्रवाशांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते मात्र काही वर्षानंतर हे इंजिन लोको शेडमध्ये परत आणण्यात आले. गेल्या 26 वर्षांपासून अडगळीत पडून असलेतरी रेल्वे सेवेला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे इंजिन बाहेर काढून ठाणे ते परेल चालवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता व पुन्हा इंजिन मूळ जागी लोको शेडमध्ये आणण्यात आले होते मात्र आता हेच इंजिन पुन्हा एकदा पर्रटकांच्या सेवेसाठी धावण्यासाठी सज्ज होत आहे.
पधारो म्हारो देस…
झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी… ही प्रत्येकानेच लहाणपणी ऐकलेली व बोललेली कविता मात्र बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वाफेवर व कोळशावर चालणारे इंजिन मागे पडून डिझेल व इलेक्ट्रीक इंजिन वापरात आल्यानंतर जुने इंजिन केवळ संग्रहालयातच पहावयास मिळत होते मात्र परदेशी पर्रटकांना (व्हेरिटेज) या इंजिनाच्या गाड्यांमध्ये बसण्याची भारी हौस पाहता रेल्वे बोर्डाने दिल्ली ते अलवार या 150 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी वाफेवर चालणार्या इंजिनाच्या गाड्या सुरू करून पर्रटनाला चालना दिली आहे.
रेवाडीहून आले स्पेअर पार्टस्
1955 च्या सुमारास इंग्लडमध्ये तयार झालेल्या या इंजिनातील काही स्पेअर स्पार्टस् गायब झाल्याने ते रेवाडी येथून मागवण्यात आले आहेत. इंग्लडमधील टीमकन या बेरींग बनवणारी कंपनी आजघडीला बंद असलीतरी इंजिनात लागणार्या काही बेअरींग रेवाडीच्या रेल्वे दुरुस्ती केंद्रातून मागवण्यात आल्या शिवाय डेड ग्रीसही मागवण्यात आले आहे. राजस्थानातील रेवाडी येथे वाफेवर धावणार्रा इंजिनांची दुरुस्ती केली जाते. भुसावळातील इंजिन बंद असल्याने किमान ते टोईंग करून नेले जाईल या स्थितीत आणण्याचे काम हे तज्ज्ञ करीत आहेत. आठवडाभरात हे काम पूर्ण होताच हे इंजिन रेवाडीकडे टोईंग (टोचन) करून नेण्यात येणार आहे.