तॉरुंगा : न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत भारताने सर्व पाचही सामने ५-० ने जिंकून न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत व्हाइट वॉश दिला आहे. अतिशय अविस्मरणीय अशी ही मालिका ठरली आहे. टीम इंडियासाठी हा ऐतिहासिक मालिका विजय आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरची लढत झाली. शेवटचा सामनाही अतिशय अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत आलेल्या या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचे पाठलाग करताना न्यूझीलंडची चांगलीच दमछाक झाली. १५७ धावांपर्यंतच न्यूझीलंडला मजल मारता आली.