दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी; बब्बर खालसा संघटनेच्या दहशतवाद्यांना अटक

0

नवी दिल्ली: बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आले आहे. भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून सहा पिस्तुले आणि 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकीत या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांकडून हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने धक्कादायक माहिती दिली होती. धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. IED स्फोटकांचा साठा जप्त केला. अबू युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली होती.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली होती. अबू युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव असून दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. अबू युसूफने राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा मोठा डाव असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला होता.