दिल्ली भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार चुकला; सुधीर मुनगंटीवार यांचे विधान !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. ७० पैकी ५८ जागांवर आम आदमी पक्षाला आघाडी आहे तर १२ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दरम्यान निकालावर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया देण्यात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत कमी पडला, त्यामुळे दिल्लीत भाजपला सत्ता मिळत नसल्याचे विधान केले आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री पदाचा भाजपने दिलेला उमेदवार चुकल्याची स्पष्ट कबुली सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शाहीनबाग या एकच मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढलेली असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेली मोफत वीज योजना मतदारांना आवडल्याचे सांगत ती आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडल्याची कबुली दिली आहे.