दिल्ली महापालिका निवडणुकीत इव्हीएम मशीनवरच मतदान

0

नवी दिल्ली । दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. राज्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांनी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना, मतदानासाठी इव्हीएम मशीनच वापरल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी 22 एप्रिल रोजी मतदान होईल आणि 24 एप्रिलला निकाल जाहीर होतील.
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिका वापरल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी केली होती.