नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक ८ फेब्रुवारीला होत आहे. निवडणुकीची मतमोजणी ११ फेब्रुवारीला होणार आहे. सर्व राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केले असून उमेदवारी अर्ज देखील भरले गेले आहे. काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, हेमा मालिनी, सनी देओल, गौतम गंभीर, रवी किशन, दिनेश लाल यादव आदींचा यात समावेश आहे.
स्टार प्रचारक आता प्रचाराला सुरुवात करणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्यापुढे भाजपने दिग्गजांची फळी उभी केली आहे. त्यापुढे केजरीवाल यांची कस लागणार आहे. दिल्ली निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.