दिल्ली रणजी संघात नेतृत्वबदल

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघामधील वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्याकडे एका रणजी संघाच्या नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रणजी हंगामाला सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी संघाचे कॅप्टनपद सोडले आहे. त्यामुळे आता गंभीरच्या जागेवर इशांत शर्मा दिल्लीच्या संघाची धूरा सांभाळणार आहे. गौतम गंभीर गेल्या चार हंगामापासून रणजी करंडक स्पर्धमध्ये दिल्लीच्या संघाचे नेत्रृत्व करत होता.

कर्णधारपद सोडले असले तरी गौतम गंभीर खेळाडू म्हणून संघामध्ये राहणार आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, गौतम गंभीरने संघटनेला पत्र लिहीले असून त्यात त्याने आपल्या निर्णयाची माहिती कळवली आहे.त्याने लिहिले आहे की, संघाच्या नेतेपदाची जबाबदारी एखाद्या दुसर्‍या व्यक्तीवर सोपविण्याची ही योग्य वेळ आहे. यामुळे मी संघामध्ये माझे चांगले योगदान देऊ शकेल.